समुद्रातील उंच उंच लाटात नौदलाच्या आयएनएस कोचीने सुखरूप वाचवले; जीवनराम यांची आपबीती
मुंबई - समुद्राच्या उंच उंच लाट येत होत्या. पी 305 या बार्जमध्ये तीन तास आम्ही पाण्यात होतो. मोठ्या मेहनतीने नौदलाच्या आयएनएस कोचीने वाचवले सुखरूप वाचवले. हिमाचल प्रदेशच्या असलेल्या जीवन राम हे पी 305 बार्जवर काम करत होते. चक्रीवादळाच्या दरम्यान कशा प्रकारचा त्यांचा अनुभव व नौदलाने त्यांचे प्राण कसे वाचवले यासंदर्भात त्यांनी ईटीवी भारतला आपला अनुभव कथन केला. तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या अरबी समुद्रातील पी 305 या बार्जवरील तब्बल 185 जणांना भारतीय नौदलाच्या आयएनएस कोचीद्वारे वाचविण्यात आलेले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे बचावकार्य हाती घेण्यात आले होते. बचाव कार्यादरम्यान भारतीय नौदलाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, अशा परिस्थिती सुद्धा भारतीय नौदलाच्या आयएनएस कोचीने 185 जणांना सुखरूप वाचवले आहे. यापैकी 124 जणांना मुंबईतील नेवल डॉक येथे आणण्यात आले होते.
Last Updated : May 19, 2021, 4:02 PM IST