Jamal Changed Sex : लग्नासाठी बदलले लिंग, मात्र प्रियकराने दिला धोका! - जमाल शेख लिंग बदल
मुंबई - लग्नासाठी लिंग बदल करून 'तो' 'ती' झाली आणि त्याने तिला धोका दिला. झालं असं की, जमाल शेख या तरुणाचे शेजारील एका फुरकान शेख या तरुणावर प्रेम झाले. जमाल हा मूळचा कोलकाता येथील रहिवासी असून, सध्या तो मुंबईत राहत आहे. दोघेही पुरुष असल्यामुळे लग्न करणे शक्य नव्हते. त्यामुळे जमाल याने दोन लाख रुपये खर्च करून लिंग बदल करून घेतले. तसेच त्याने जमाल हे नाव बदलून शिल्पा शेख असे ठेवले. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंधही ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लग्न करण्याची वेळ आली तेव्हा फुरकान शेख याने लग्नास नकार दिल्याचे जमाल शेख याने सांगितले. यानंतर जमाल याच्या कुटुंबीयांनही त्याला स्विकारण्यास नकार दिला आहे.