महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जलयुक्त शिवारामुळे भूजल पातळी वाढली - पंजाबराव डख - Groundwater level increased due to waterlogged shivara

By

Published : Oct 31, 2021, 9:01 PM IST

जालना - जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामध्ये नदी, नाले आणि ओढ्यात आधी पाऊस कमी होत असल्याने पाणी साचत नव्हते पण आता पाऊस मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या योजनेचा चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत असल्याचे मत पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. ते जालन्यातील राजूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेच्या सुरु असलेल्या चौकशी बाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. या योजनेच्या माध्यमातून भरपूर कामे झाली असून आता त्यात चांगल्याप्रकारे पाण्याची साठवणूक होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत असून विहिरी, बोअरवेल्स गच्च भरून वाहत असल्याची उदाहरणे देखील त्यांनी दिली. यापुढेही पावसाचे प्रमाण वाढणार असून शेतकऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details