खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; येवल्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष - भाजपा जल्लोष येवला
येवला (नाशिक)- दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने येवल्यातील अटल बिहारी वाजपेयी चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. सलग तीन वेळा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून दिलेला आहे. या मतदारसंघाला व उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात अभ्यासू वृत्ती व मतदार संघातील समस्या निर्भिडपणे संसदेत मांडण्याच्या जोरावर नियुक्ती झाल्याचे सांगत, येवला शहरात भाजपा कार्यकर्त्याकडून जल्लोष करण्यात आला.