राज्य शासनाने सर्व स्थानिक कर रद्द करावेत; जळगावातील व्यापाऱ्यांची अर्थसंकल्पाकडून अपेक्षा - जळगाव व्यापारी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा न्यूज
जळगाव - केंद्र सरकारने जीएसटी कायदा अंमलात आणला, त्यावेळी राज्य शासनाने व्यवसाय कर, मार्केट फी यासारखे स्थानिक कर रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सुरुवातीच्या काळात वित्तीय तूट लक्षात घेऊन हे कर कायम ठेवण्यात आले होते. जीएसटी कायदा अंमलात येऊन आता बराच काळ लोटला आहे. तरी, हे कर आकारले जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने हे कर आता रद्द केले पाहिजेत, अशी अपेक्षा जळगावातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा व्यापारी मंडळाचे सचिव ललित बरडियांनी याची माहिती दिली.
Last Updated : Mar 8, 2021, 10:54 AM IST