महाराष्ट्र

maharashtra

शेतकरी अडचणीत असताना तत्काळ पंचनामे करून मदत देणं गरजेचं - राज्यमंत्री बच्चू कडू

By

Published : Oct 2, 2021, 3:21 PM IST

अमरावती - संततधार पावसामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर आदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पंचनामे करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणीही मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details