थंडी वाढली, शोकोट्या पेटल्या; गावोगाव गप्पा रंगल्या - थंडीबाबतच्या बातम्या, व्हिडिओ
अमरावती - मागील आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यात देखील दमट वातावरण असल्याने थंडी जाणवत नव्हती. परंतु, आता हळूहळू आभाळ मोकळे झाल्याने विदर्भात थंडी पडू लागली आहे .विदर्भातही दोन दिवसापासून थंडीने जोर धरला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावी लोकांनी आता शेकोट्या पेटवलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागात शेकोट्यावर तासंतास बसून शेतकरी ग्रामस्थ गप्पांचे फड रंगवत आहेत.