मराठी ओटीटीची येत्या ५ वर्षांत असेल ५०० कोटी रुपयांची उलाढाल - अक्षय बर्दापूरकर - marathi ott
गेल्या एक ते दोन वर्षात कोरोनामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, या कालावधीमध्ये ओटीटी माध्यमांनी प्रेक्षकांना साथ दिली. अधिक कसदार आणि नवीन आशय आणत प्रेक्षकांना हसत खेळत ठेवले. याच पार्श्वभूमीवर प्रेक्षक आणि कलाकारांना जोडणाऱ्या या ओटीटी माध्यमाविषयी प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांच्याशी ईटीव्ही भारतने विशेष संवाद साधला. मराठी ओटीटीविश्वाची भविष्य उज्ज्वल असून, पुढील ५ वर्षात ५०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहूयात ते काय म्हणाले ?