Amravati Violence : अमरावतीत इंटरनेट बंद; विद्यार्थी व नागरिकांची शहराबाहेर गर्दी
अमरावती - शहरात हिंसाचार उफाळल्यानंतर शहरातील इंटरनेट सेवा बंद (Internet off in Amravati) करण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास होत नाही तसेच इंटरनेटवरील चालणारे आर्थिक व्यवहार व इतर व्यवसाय इंटरनेट अभावी बंद झाले आहे. त्यामुळे इंटरनेटच्या शोधात अमरावतीमधील तरुण व विद्यार्थी शहराबाहेर 7 किलोमीटर दूर आले आहेत. शहराबाहेर इंटरनेट मिळत असल्याने अमरावती-नागपूर हायवे लगत मोठ्या प्रमाणावर गर्दी इंटरनेटसाठी होत आहे या ठिकाण वरून आढावा घेऊन बातचीत केली आमचे अमरावतीचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...