महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा व्हावा - श्रीपाल सबनीस - श्रीपाल सबनीस बातमी
पुणे - आपली मातृभाषा केवळ देशपूर्ती मर्यादित नसून सबंध विश्व हिच माझी मातृभाषा आहे. म्हणूनच मातृभाषा, मातृ संस्कृती, विश्वात्मक संस्कृती या सर्वांची गाभ्याची एक बेरीज, संवादी सामर्थ्याची एक बेरीज, जे विश्वाच्या नकाशात अपेक्षित आहे. म्हणून या दृष्टीने महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात यावे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.