#Exclusive:(भाग-1) 'विषाणू सतत रूप बदलत असल्याने त्यावर लस शोधणे आव्हानात्मक' - डॉ. ब्रह्मनाळकर - maharashra corona news
महामारीची सुरुवात झाल्यानंतर जगाच्या पाठीवर विविध वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. बाजारात लस येईपर्यंत रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी डॉक्टरांचे तसेच आहारतज्ज्ञांचे सल्ले घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. याच काळात तज्ज्ञांकडून 'हर्ड इम्युनिटी'चा विषय समोर आला. याच संदर्भात डॉ. ब्रम्हनाळकर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. कोरोनाचा विषाणू सतत रूप बदलत असल्याने तसेच त्याच्या जनुकीय बदल समोर येत असल्याने त्यावर लस शोधण्यात वेळ लागत आहे, असे ते म्हणाले.