VIDEO : मेळघाटातील अनेक भागातील पिकांवर 'केसाळ' अळीचा प्रादुर्भाव
अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट भाग पहाडी आहे. त्यामुळे येथे शेती कसने म्हणजे जिकरीचे काम आहे. त्यात अनेकदा पाऊस जास्त होतो. त्यामुळे हमखास उत्पन्नाची हमीदेखील नाही. त्यामुळे येथील शेतकरी नेहमी विविध संकटात सापडत असतो. पेरणीला अवघे काही दिवस झाले असतानाच येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे. चिखलदरा तालुक्यातील जंगल भागातील जवळपास सात ते आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या केसाळ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आल्याने पिके धोक्यात आली आहेत.