महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : अँटिलिया प्रकरण; दक्षिण मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - अँटिनिया बेवारस कार

By

Published : Feb 26, 2021, 3:07 PM IST

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर मिळालेल्या बेवारस स्कॉर्पिओ गाडीमधून जिलेटीन स्फोटक मिळाले. यानंतर या परिसरामधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना 2013 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनकडून ठार मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना सीआयएसएफ झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र , गुरुवारच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अँटिलिया इमारत असलेला परिसर व्हीआयपी परिसर म्हणून ओळखला जातो. अँटिलिया या इमारती बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details