मालाड; पाण्याच्या पाईपलाईनचे काम अर्धवट; महापालिकेचा भोंगळ कारभार - water pipeline work malad news
मुंबई- मालाड -मार्वे रसत्यावर महापालिकेच्यावतीने पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मागील २ दिवसांपासून चाललेल्या या कामासाठी रसत्यावर मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र, काम पूर्ण न करताच नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय. परिणामी नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. तर दुसरीकडे रसत्यावर खोदण्यात आलेला खड्डा तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच अपघाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.