लिलावात टोमॅटो न घेतल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप; टोमॅटो रस्त्यावर फेकले - tomato on road Vinchur Chaufuli
नाशिक - येवला तालुक्यातील धामणगाव गावातील शेतकरी आण्णा थोरात व सुनील जेजुरकर यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून आणलेले टोमॅटो विंचूर चौफुली रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केला. या शेतकऱ्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमधून 120 कॅरेट टोमॅटो लिलावाकरिता आणले होते. मात्र, लिलावात कोणीही टोमॅटो न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड शिर्डी महामार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली येथे आपले 120 कॅरेट टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. विंचूर चौफुली येथे सर्वत्र लालच लाल चिखल झाल्याने व टोमॅटोचे ढीग झाल्याने सर्व टोमॅटो हे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात येऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. टोमॅटोला भाव मिळावा, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी करीत आहे.