अन्..... पावसात चिपळूणच्या साळवींचे दुकानही गेले पाण्याखाली - chiplun rain update
रत्नागिरी - मुसळधार पावसाचा फटका अवघ्या राज्याला बसला आहे. चिपळूणच्या मध्यवर्ती बसस्थानकात पाणी शिरले आहे. जवळपास 15 ते 20 फूट पाणी शिरले होते. 30 तासाहून अधिक वेळ या ठिकाणी पुराचे पाणी होते. येथील सर्व आस्थापना पाण्यात होत्या. सध्या पूर ओसरला असला तरीही, चिखलाचं साम्राज्य आहे. तसेच आगाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान बस स्थानकातील छोट्या दुकानदाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपंग असलेल्या प्रवीण साळवी यांचं मोबाईल कव्हर, रिचार्जचं या ठिकाणी गेली 22 वर्ष छोटंसं दुकान आहे. 22 वर्षांत त्यांनी एवढा पूर पाहिला नव्हता. मात्र, त्यांच्या मेहनतीवर पुराने पाणी फेरलं आहे. दुकानदार प्रवीण साळवी यांच्याशी बातचीत केली आहे ईटीव्हीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.....