ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ - अमरजीत यादव ठाणे फेरीवाला
ठाणे : पालिकेच्या माजीवडा - मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी अमरजीत यादव असे हल्लेखोराचे नाव आहे. अमरजीतचा आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी तो स्वतःला चाकूने जखमी करुन घेण्याची पोलिसांना धमकी देत होता. हातामध्ये दोन चाकू घेऊन तो हवेत भिरकावत होता. पोलीस त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. त्याला विनवण्या करतात, असे या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, ठाण्यात काल अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू होती. यावेळी फेरीवाल्या अमरजीतने सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला. यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे छाटली गेली आहेत. यानंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली.