Shilphata Godavun fire In Thane : ठाण्यात शिळफाटा गोडावूनला आग;मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जळून खाक - Shilphata Godavun fire In Thane
ठाणे - ठाण्यात गोडावून परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिळफाटा भागातील खान कंपाउंडमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. (Shilphata Godavun fire In Thane) या आगीत प्लास्टिकचे गोडावून जळून खाक झाले आहे. दरम्यान पहाटेपर्यंत ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने (Shilphata Godavun) या आगीवर नियंत्रण मिळवले होते. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी या आगीत आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. (Shilphata Godavun fire) प्राथमिकपणे ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.