Corona Bulletin : राज्यातील कोरोनासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ६२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली होती. परंतू कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अमरावती आणि अकोलामध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा सात दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये मिनी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच १ मार्चपासून खासगी रुग्णालयात २५० रुपयांमध्ये कोरोना लस उपलब्ध होणार आहे. तर सरकारी रुग्णालयात मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.