VIDEO : मुंबईत बाजारपेठेमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी - मुंबई बाजारपेठ लॉकडाऊन अंमलबजावणी बातमी
मुंबई - कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात पुन्हा एकदा कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये दुकाने बंद ठेवण्यात आलेली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...