मुंबईत दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन - मुंबई गणेश बातमी
मुंबई - यंदा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. आज (23 ऑगस्ट) दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. सकाळपासून मुंबईत दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी दादर चौपाटी येथे भाविकांची लगबग सुरू होती. महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावाची व्यवस्था तसेच फिरत्या वाहनाची देखील सोय करण्यात आली आहे. ज्यांना घरा बाहेर न पडता गणेश मुर्तीचे विसर्जन करायचे आहे. त्यांच्यासाठी या वाहनांची सोय केली गेली आहे.