महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mahavikas Aghadi Dispute : महाविकास आघाडीत बिनसलं.. नवीन मित्र शोधण्याचा 'या' पक्षाचा इशारा - व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालावी

By

Published : Jan 29, 2022, 5:31 PM IST

सांगली - माजी आमदार व पीपल्स रिपब्लिकनचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे ( PRP President Jogendra Kawade ) यांनी मित्र पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत मित्र पक्षांना डावलून कामकाज होत आहे. गेल्या अडीच वर्षात आघाडीतील पक्षांना न्याय दिला नाही. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिक पणाला काळिमा फसला असून, आघाडीत आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही मित्र पक्ष शोधू, असा इशारा पीपल्स रिपब्लिकनचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिला ( Jogendra Kawade warns Mahavikas Aghadi ) आहे. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावर ठाकरे सरकारने बंदी घालावी ( Ban Why I Killed Gandhi In Maharashtra ) अन्यथा, आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,असा इशारा ही जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details