चार तास दुकाने सुरू ठेवल्यास गर्दी होईल; व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाची प्रतिक्रिया - Trade Association President Viren Shah reaction
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारकडून एक नियमावली जाहीर झाली. यामध्ये किराणा मालाच्या दुकानांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी मात्र या सूचनांचा पुनर्विचार करावा, अशा स्वरुपाचे पत्र राज्य सरकारला ई-मेलद्वारे पाठवले आहे.
TAGGED:
वीरेन शहा ई-मेल राज्य सरकार