पीएमपीएमएल सुरू न केल्यास उद्यापासून भाजपा शहरात करणार आंदोलन - पुणे कोरोना अपडेट
पुणे - शहरात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. प्रशासनाने या सात दिवसाच्या काळात काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएल बस सेवेलाही सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. पीएमपीएमएल सेवा बंद ठेवू नये, अशी मागणी करत आज पुण्यातल्या स्वारगेट इथल्या मुख्यालयात खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी घेतलेला हा आढावा..