राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रातील लोकांनी मला शिव्या दिल्या तरी मला चांगले वाटेल; पाहा VIDEO - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लेटेस्ट न्यूज
वाशिम - महाराष्ट्रातील लोकांनी मला शिव्या घातल्या तरी मला चांगले वाटेल, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. राज्यपाल कोश्यारी आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर (Bhagat Singh Koshyari in Washim) आले आहेत. यावेळी त्यांनी जैन धर्मियांचे देवस्थान असलेल्या शिरपूर येथील पार्श्वनाथ जैन मंदिर येथे दर्शन घेतले. यावेळी स्वागत समारोहाच्या वेळी महाराष्ट्रातील लोक चांगले असून, मला महाराष्ट्र खूप आवडला आहे. येथील लोकांनी मला शिव्या जरी घातल्या तरी मला आवडेल, असे राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.
TAGGED:
Bhagat Singh Koshyari video