नवीन ग्राहक संरक्षण कायदा कागदावर चांगला वाटतो- जहांगीर घई - जहांगीर घई लेटेस्ट न्यूज
मुंबई -१५ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा होत असतो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नाचे निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून देशात ग्राहक संरक्षण कायदा मध्ये झालेले बदल ग्राहकासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेण्यासाठी या ग्राहक संरक्षण कायद्याचे अभ्यासक जहांगीर घई यांच्याशी केलेली बातचीत.