..जगातील एकमेव असे मंदिर, जेथे विराजमान डाव्या अन् उजव्या सोंडेचे दोन गणपती ! - डाव्या अन् उजव्या सोंडेचे दोन गणपती
एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय येथील प्राचीन गणेश मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. गणपतीच्या अडीच पिठांपैकी पद्मालय हे अर्धपीठ आहे. प्रवाळ क्षेत्र पद्मालय म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्रावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.