जालन्यात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन - historical armory exhibition
जालना - शहरात दख्खन प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीची शस्त्रास्त्रे होती याचा अंदाज इथे येतो. यामध्ये युद्धात वापरण्यात आलेल्या लहान-मोठ्या तलवारी, गुप्ती, धनुष्यबाण, भाला, गदा, माडु म्हणजे हाताच्या मुठीमध्ये धरण्याचे एक शस्त्र आदि ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबतच पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिक देखील आवर्जून हजेरी लावत आहेत.