VIDEO : हिजाबच्या वादाच्या समर्थनार्थ बीडच्या बशीर गंज चौकामध्ये झळकले बॅनर
बीड - कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाबच्या वादाने ( Hijab controversy in Karnataka ) आता राजकीय रंग घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या समर्थनाचे बोर्ड सध्या बीड शहरात लावण्यात ( Hijab controversy support boner in beed ) आला आहे. याच्या समर्थनाचे पोस्टर हे बशीर गंज चौकामध्ये लावण्यात आले आहे. पहिले हिजाब फिर किताब अशा आशयाचे हे पोस्टर आहे. पोस्टर लावल्यानंतर त्यांची चर्चा सध्या शहरांमध्ये जोरदार पद्धतीने सुरू आहे. शहरातील अनेक नागरिक या चौकांमध्ये जात असताना हे बॅनर वाचत आहेत. सध्या बीड शहरातील बशीर गंज चौकामध्ये लागलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष आकर्षित करून घेत आहे. यावर एमआयएम जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.