उच्चशिक्षित महिला सरपंचाने केला गावाचा कायापालट - बाभळी गाव महिला सरपंच न्यूज
नांदेड - हदगाव तालुक्यातील बाभळी येथील उच्च शिक्षित सरपंच सुप्रिया मुनेश्वर या तरुणीने गावाचा कायापालट केला. सुप्रियाने मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तिकडे शिक्षण घेऊन गावाकडे आलेली सुप्रिया 2015 साली गावची सरपंच झाली. आपल्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा फायदा गावासाठी कसा करता येतो, याचे उत्तम उदाहरण या सरपंच तरुणीने दाखवून दिले आहे. तिने गावातील रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी, लाईट, शाळा, अंगणवाडी याबाबींची कामे केली आहेत.