Mumbai High Speed Water Taxi : मुंबईतील पहिली अत्याधुनिक हायस्पीड वॉटर टॅक्सी! पाहा Exclusive Video - Book my boat. com
मुंबई - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी असून मुंबईकरांचा सेवेत आता सुपर वेगवान पाण्यावर चालणारी टॅक्सी दाखल ( High Speed Water Taxi in Mumbai ) झाली आहे. मुंबई ते बेलापूर या मार्गावर ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु ( Water taxi service started on Mumbai to Belapur ) होणार आहे. यामुळे बेलापूर ते मुंबईचा प्रवासाचे अंतर सुद्धा कमी होणार आहे. सध्या भाऊचा धक्का ते बेलापूर अंतर जलमार्ग २० किलोमीटर तर रस्तेमार्ग ४० किलोमीटर असून लागणारा वेळ हा जलमार्गाने ३० मिनिट आणि रस्तेमार्गाने १ तास आहे. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांची वेळेची बचत होणार आहे. कमीत कमी वेळेत मुंबईपासून नेरूळ, बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा इथे पोहोचता येईल. त्यासाठी 'बुक माय बोट डॉट कॉम' ( Book my boat. com ) या वेबसाइटवर तिकीट उपलब्ध असणार आहे. मुंबईतील पहिली अत्याधुनिक हायस्पीड वॉटर टॅक्सी चा ईटीव्हीचे प्रतिनिधी नितीन बिनेकर यांनी घेतला हा विशेष आढावा...