जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, घनसावंगी तालुक्यात पूर परिस्थिती - Heavy rains in jalna district
मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील बानेगाव परिसरात शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर, शेवगळ जटाशकंर नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी असणारा रास्ता ही पाण्याखाली गेला आहे. तसेच, अंबड शहरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पावसाच्या पाण्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.