निसर्ग चक्रीवादळ : गेट वे ऑफ इंडिया परिसरात मुसळधार पाऊस, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम
मुंबई - निसर्ग चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धडकले. त्यामुळे मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ लाटा उसळत आहेत. तसेच समुद्राच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. या परिसरात मुसळधार पाऊस पडत असून झाडे देखील उन्मळून पडली आहेत. याबाबत गेट वे ऑफ इंडिया येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी...