मुंबईत मुसळधार; दादर, परळ अन् हिंदमाता परिसरात साचले पाणी - मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. येथील दादर, परळ, हिंदमाता परिसरात दरवर्षीप्रमाणे पाणी साचले आहे. यावर्षीही पालिकेने पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा फोल ठरला आहे. मुंबईत सकाळी समुद्राला भरती असताना जर पाऊस झाला असता तर मुंबईची तुंबई झाली असती. मात्र, सायंकाळी पाऊस पडू लागल्याने सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.