कधी संपणार भामरागड वासियांच्या नरकयातना?; दरवर्षी तुटतो जगाशी संपर्क - gadchiroli news
🎬 Watch Now: Feature Video
अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड लोकांचा दरवर्षीच्या पावसाळ्यात जगाशी संपर्क तुटतो. जवळपास एक महिना येथील नागरिक संपर्कहीन असतात. मात्र, 7 आॅगस्टला आलेला महापूर येथील नागरिकांना बेघर करुन गेला. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. आता मायबाप सरकारने जशी कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांना मदत केली तशी भामरागड वासियांना करणार काय? असा संतप्त सवाल येथील पूरग्रस्त नागरिक करीत आहेत.