VIDEO : चिपळूणमध्ये महाप्रलय, 2005 पेक्षाही भयंकर पूरस्थिती - चिपळूण पाऊस बातमी
रत्नागिरी - रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण शहर जलमय झाले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले आहे. शहरात 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आला आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चिपळूणमधल्या रावतळे परिसरातून या पुराचा आढावा घेत, स्थानिक नागरिकांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...