विजांच्या कडकडाटात चमकले बजरंगबली, व्हिडीओ होतोय व्हायरल
बुलडाणा - हवामान खात्याच्या अंदाजनुसार सोमवारी 27 सप्टेंबरच्या रात्रीपासून जिल्ह्यात विजेच्या कडकडासह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, विजेचा आवाज आणि प्रकाश इतका तिव्रतेचा होता, की विजेचा आवाज झाला की रात्रीचा काळोख बाजूला होऊन सगळीकडे प्रकाशच प्रकाश व्हायचा. असाच विजांचा कडकडाड बुलडाण्यातही सुरू होता. दरम्यान, विजेचा मोठ्ठा आवाज झाला त्यावेळी जो प्रकाश पडला, त्या प्रकाशात गावातील हनुमानाची मुर्ती लख्ख चमकताना दिसत आहे. याचवेळी येथील नागरिकांनी आपल्या घरातून काही व्हिडीओ शुट केले आहेत. त्यातीलच हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होते आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात (26 ते 28)सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवण्यात आला होता.