हस्तशिल्पकला; काश्मीर खोऱ्यातील कलेचे सर्वोत्तम उदाहरण - Kashmir Valley art news
काश्मीरच्या हस्तशिल्पांची जगभरात एक वेगळी ओळख आहे. अकरोडाच्या लाकडावर कोरलेली ही शिल्पे काश्मीर खोऱ्यातील कलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगीक प्रगतीमुळे काश्मीरातील हस्तशिल्प व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, सरकारने या उद्योगावर आणि कलेवर कधीच लक्ष दिले नाही. कारागीरांच्याबाबतीत श्रीनगर जिल्हा, काश्मीरला एक वेगळी ओळख देतो. काश्मीरातील इस्लामचे संस्थापक मीर सैय्यद अली हमदानी आणि त्यांच्या साथिदारांनी ७व्या शतकात पूर्व कश्मीरमध्ये हस्तशिल्प कला रुजण्यास मदत केली होती. त्यासोबतच या कलाकारांसाठी एक आर्थिक मॉडेलसुद्धा तयार केले होते. गुलाम नबी डार यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी हस्तशिल्पकला समृद्ध करण्यासाठी आपले आयुष्य घालवले. आता ही कला टिकवून ठेवण्याची जबाबदारी येणाऱ्या युवा पिढीची आहे.