Gujarat CM meet businessmen : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत साधला उद्योजकांशी संवाद - गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबई दौरा
मुंबई - गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज मुंबई दौऱ्यावर (Gujarat CM Bhupendra Patel Mumbai Visit) आहेत. जानेवारी महिन्यात होणारा 10 वा 'व्हायब्रंट गुजरात' (10th edition of Vibrant Gujarat Global Summit 2022) या कार्यक्रमासाठी उद्योजकांना आमंत्रित करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत. जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष महेश पळशीकर, टाटा कंपनीचे चेअरमन एन चंद्रशेखरन, कोटक बँक लिमिटेडचे सीईओ उदय कोटक, सन फार्माचे दिलीप संघवी, सिएट टायर कंपनीचे अनंत गोयंका, रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निखिल मालवनी यांच्यासह इतर अनेक व्यावसायिकांची गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भेट घेतली.