वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण - 75th independence day
वाशिम - आज देशभरात 75 वा स्वतंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वाशिम मध्येही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हावाशियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी,आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी वसुमना पंत सह अधिकारी उपस्थित होते.