कर्जत-जामखेड मधून राम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात - राम शिंदे
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी यापूर्वीच शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला होता. यावेळी बोलताना शिंदे यांनी 'आज जमलेली गर्दी पाहता कर्जत-जामखेडचा गड आपण तिसऱ्यांदा सर करू', असा विश्वास व्यक्त केला आहे