मुंबईच्या आझाद मैदानावरील शेतकरी मोर्चाचा ग्राउंड रिपोर्ट - Shetkari Morcha Mumbai
दिल्लीच्या सीमेवर मागील काही महिन्यांपासून केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माहाराष्ट्रातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा समर्थनार्थ मुंबईतील प्रतिष्ठित आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील शेतकरी संघटनांनी मुंबईकडे कूच केली आहे.