विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती...प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई महापालिकेच्या के-पूर्व विभागात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तलाव परिसरात 10 दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा सार्वजनिकरित्या विसर्जन करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने कृत्रिम तलाव, गणेश मूर्ती दान यांसारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. मिरवणुका नसल्याने शांततेत गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. जोगेश्वरीच्या शाम नगर तलाव परिसरात पालिकेने मंडप उभारून गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक तैनात केले आहे. याचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.