नवीन पिढीला नशेच्या विळख्यातुन बाहेर काढले पाहिजे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - भगतसिंह कोश्यारीचे तरुणांना आवाहन
रत्नागिरी - सध्या ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (सोमवारी) रत्नागिरीत केलेल्या विधानाला मोठे महत्व आले आहे. नवीन पिढीला नशेच्या विळख्यातुन बाहेर काढले पाहिजे. त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची गरज असल्याचे राज्यपाल यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे डिसमॅन्टलिंग कास्टिजम : 'लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेनशियल्स ऑफ हिंदुत्व' या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.