वारी सोहळा पायीच व्हावा - वारकरी
आळंदी (पुणे) - राज्य शासनाने पालखी सोहळ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने नाराजी व्यक्त केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांमध्ये अखंड पायी वारीच्या निर्णयावर संस्थान ठाम आहे. अखंड पायी वारीसाठी जैवसुरक्षा कवच (बायोबबल)बाबत विचार करून निर्णयात फेरबदल करण्याची मागणी पालखी सोहळ्याचे चोपदार ह.भ.प. राजाभाऊ रणदिवे यांनी व्यक्त केली आहे.