राज्यात विकेंड लॉकडाऊन; वसई विरारमध्यें रस्त्यांवर शुकशुकाट - vasai_virar weekend_lockdown
पालघर/विरार :राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर आळा घालण्यासाठी राज्यसरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच आठवड्याच्या शेवटी विकेंड लॉकडाऊनही लागू केला आहे. या लॉकडाऊदरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. वसई विरारमध्ये विकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल (शुक्रवार) रात्री ८ वाजल्यापासून सुरू झालेला बंद शनिवारी सकाळपर्यंत कायम आहे.अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर आस्थापना बंद असल्याने शहरात शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांची गस्तही सुरू असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एकूणच इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी