सराफ बाजाराला कडक निर्बंधाचा फटका; अक्षय्य तृतीयेच्या मूहुर्तावर कोट्यवधीची उलाढाल ठप्प
जळगाव - कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या व्यापारासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ बाजाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या सराफ बाजारात एक रुपयाचीही उलाढाल होणार नाही. अशा परिस्थितीत सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत. साधारणपणे 100 कोटींची उलाढाल दरवर्षी या मुहूर्तावर होत असते.
Last Updated : May 14, 2021, 7:35 AM IST