विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक वेशभुषा; लमाणी अलंकारातील रुप अधिक देखणे - विठ्ठल रुक्मिणीला पारंपारिक पोशाख
पंढरपूर - पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळे निमित्त रुक्मिणी मातेस “लमाणी” पोषाख परिधान करण्यात आला होता. तसेच विठ्ठलासही पांरपरिक पोशाख आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. या अलकांरांनी विठ्ठल रुक्मिणीचे रुप अधिक मनमोहक दिसत होते. सध्या कोरोना काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. ईटव्ही भारतने खास भाविकांसाठी विठू रायाचे हे मनमोहक रुप दर्शवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.