Girna River Conservation : गिरणा नदीच्या संवर्धनासाठी ‘गिरणा परिक्रमा’ उपक्रमाला जळगावातून सुरुवात - जळगाव गिरणा परिक्रमा
जळगाव - गिरणा नदीच्या संवर्धनासाठी ( Girna River Conservation ) तसेच नदीपात्रातील बेसुमार अनधिकृत वाळू उपसा यासह विविध विषयातील जनजागृतीसाठी शनिवारी गिरणा परिक्रमा ( Girna Parikrama ) या उपक्रमाला सुरूवात झाली. यावेळी जळगावात मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंहही उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गिरणा नदीच्या संवर्धनासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी तिरंगा ध्वज घेऊन खासदार उन्मेश पाटील यांनी मान्यवरांसह गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये १४ किलोमीटर पायी प्रवास केला.