गेट वे ऑफ इंडिया परिसराची महापौर पेडणेकर यांच्याकडून पाहणी; तौक्ते चक्रीवादळात झालंय नुकसान
मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर ऐतिहासिक वास्तू असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात असलेला कठडाही तुटला आहे. याची पाहणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. यावेळी मुंबईत झालेल्या झाडांच्या पडझडीमुळे दोन मुंबईकरांचा मृत्यू झाल्याची माहिती महापौरांकडून देण्यात आली. तसेच गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेली पडझड आणि मुंबईत इतर ठिकाणी झालेले नुकसान याची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.